आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन:जवान पाटील यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार

धुळे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील रहिवासी तथा सैन्य दलातील जवान मनाेहर रामचंद्र पाटील यांना सोमवारी वीरमरण आले. त्यांचा पार्थिवदेह सैन्य दलाच्या विमानाने पुणे येथे आणण्यात आला. तेथून उद्या बुधवारी सकाळी ताे न्याहळाेद येथे रुग्णवाहिकेद्वारे आणला जाईल. त्यानंतर तेथे अंत्यसंस्कार होतील.सियाचीनमध्ये आॅपरेशन मेघदूतमध्ये कर्तव्य बजावत असताना प्रकृती खराब झाल्याने मनोहर पाटील यांना दिल्ली येथील सैन्य दलाच्या हाॅस्पिटलमध्ये दाखल केले हाेते. उपचार सुरू असताना सोमवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव न्याहळाेद येथे आणण्यात येणार आहे.

तेथे मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवला जाईल. त्यानंतर सकाळी १० वाजता गावातील महादेव मंदिरासमाेरील मैदानावर अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती ज्ञानेश्वर पाटील यांनी दिली. अंत्यसंस्कारासाठी मंगळवारी दिवसभर गावात तयारी सुरू होती. जवान पाटील यांच्या पश्चात आई-वडील, चार भाऊ, पत्नी, मुलगी असा परिवार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...