आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आला गणेशोत्सव:लाडक्या बाप्पासाठी कोल्हापूर, मुंबईची आभूषणे; दीड हजारापासून एक लाखापर्यंत सोन्या-चांदीचे दागिने बाजारात

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचे निर्बंध नसल्याने यंदा गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होईल. बाजारपेठ सजावटीच्या साहित्याने सजली आहे. शहरातील सराफांकडे गणपत्ती बाप्पासाठी सोन्या-चांदीचे दागिने विक्रीस आले आहेत. कोल्हापूर, मुंबईहून विविध आभूषणे, मूर्ती साहित्य सराफांनी मागवले आहे. कोरोनामुळे दोन वर्षे गणेशोत्सवात सराफ व्यवसायात मंदी होती. यंदा या उलट चित्र असून, भाविकांनी गणपत्ती बाप्पासाठी दागिने खरेदीस सुरुवात केली आहे.

यंदाचा गणेशोत्सव आगळावेगळा ठरावा यासाठी भक्तांचे नियोजन सुरू झाले आहे. सराफ बाजारात गणपत्ती बाप्पासाठी विविध आकार, प्रकारातील आकर्षक चांदीचे दागिने विक्रीस आले आहे. अगदी ५० रुपयांच्या दूर्वापासून पाच हजार ते त्या पुढील किमतीचे दागिने विक्रीस आहे. यंदा गणपत्ती बाप्पाची एक किलो वजनाची चांदीची भरीव मूर्तीही सराफ बाजारात आली आहे. सराफ बाजारात दागिन्यांची किंमत १ हजार ५०० रुपयांपासून ते एक लाखापर्यंत आहे. मुकुट, चांदीच्या दूर्वा, नक्षीदार हार, दूर्वांचा हार, हातातील विविध शस्त्रे, बाजूबंद, जास्वंदीची फुले, कमळ फुले, कुंद, चांदीचे ताट, छत्र, पूजेचे साहित्य, मोदक, केवडा पान, लाडू सेट, पानसुपारी, नारळ आदी चांदीच्या वस्तू विक्रीस आहेत.

स्थानिक कारागिरांनीही तयार केले आहेत दागिने
मूर्तीसह सजावटींना वापरले जाणारे विविध दागिने स्थानिक कारागीर तयार करतात. तसेच मुंबई, नाशिक येथून तयार दागिने मागवले जातात. बाजारात चांदीचे एक तोळ्यापासून १०० ग्रॅमपर्यंतचे तर सोन्याचे एक ग्रॅम ते १० ग्रॅमपर्यंतचे दागिने विक्रीस आहे.

दागिन्यांच्या किमतीत २० टक्के वाढ
गणेशमूर्ती सजावटीसाठी लागणारे विविध प्रकारचे दागिने विक्रीस आले आहेत. दागिन्यांच्या किमतीत २० टक्के वाढ झाली आहे. अनेक भाविकांकडून चांदीच्या दागिन्यांबाबत विचारणा करण्यात आली आहे.
विक्रम राठोड, अरिहंत ज्वेलर्स,धुळे

बातम्या आणखी आहेत...