आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित आयएमआरडी परिसंस्थेतील पदवी विभागातील बीबीए व बीएमएसच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची विविध कंपनीत कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड करण्यात आली.
इन्फोसीस बीपीएम या कंपनीत बीबीए अंतिम वर्षातील आराध्य प्रमोद व्यास, श्रेयश गिरीश वाणी, सागर भटू सोनार, प्रमोद प्रकाश पाटील, नयन विजयसिंग राजपूत, प्रशांत हिरालाल शिरसाठ, कीर्तेश संजय पाटील, मयूर राजेश पवार, भूषण विकास पाटील या विद्यार्थ्यांची निवड झाली. टाटा कन्सल्टन्सी कंपनीत बीएमएस अंतिम वर्षातील अनुष्का विश्वास पित्रे, ऋचा विनोद एडकी, दिव्या सुनील पाटील, मिहीर हरिओम जाधव, गोविंद विनोद कलाल, बीबीए अंतिम वर्षातील सुयश किशोर कोठारी या विद्यार्थ्यांची निवड झाली. डाबर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत बीएमएस अंतिम वर्षातील तेजस्विनी गोपाळ पाटील या विद्यार्थिनीची निवड झाली.
परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनखाली प्लेसमेंटचे आयोजन ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. अर्चना जडे व ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट समितीने केले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आमदार अमरीश पटेल, आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष भूपेश पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील, एमसीए व आयएमसीए विभागप्रमुख प्रा. मनोज बेहेरे, एमएमएस विभागप्रमुख व आयक्यूएसी समन्वयक डॉ. मनोज पटेल, पदवी विभागप्रमुख डॉ. तुषार पटेल यांनी समाधान व्यक्त केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.