आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना न्याय द्यावा; मंत्री दादा भुसे यांना शिवसेनेने निवेदन देऊन केली मागणी

धुळे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने ११ मार्च २०१६ राेजी काढलेले परिपत्रक रद्द करावे, सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांवर हाेणारा अन्याय थांबवून लाड, पागा समितीने शिफारस केलेली वारसा पद्धत पुढे सुरू ठेवावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत राज्याचे मंत्री दादा भुसे यांनाही निवेदन देण्यात आले.

अनेक जण पिढ्यांपिढ्या सफाई कामगार म्हणून सेवा बजावत आहे. मात्र शासनाने मार्च २०१६ मध्ये काढलेल्या परिपत्रकामुळे त्यांवर अन्याय हाेत आहे. सफाई कामगार हा कुठल्याही एका जातीचा नसून त्यात सर्वच जातीधर्माचे कर्मचारी अनेक पिढ्यापासून काम करीत आहे. मुस्लिम मेहतर समाजाचाही त्यात समावेश आहे. सफाई कामगार म्हणून १८ पगड जातीचे व विविध धर्माचे कर्मचारी कार्यरत आहेत; परंतु २०१६ च्या शासन निर्णयानुसार सफाई कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त होणाऱ्या किंवा स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या किंवा सेवा बजावत असताना निधन पावलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसाहक्काचा लाभ मिळत नसल्याने या घटकावर खूप अन्याय होतो आहे.

तरी या घटकांच्या भवितव्याचा विचार करता सन २०१६ शासन निर्णय रद्द करून सर्वच कर्मचाऱ्यांच्या हिताचा असलेल्या लाड-पागा समितीने शिफारस केलेला अहवाल लागू करून नवीन परिपत्रक काढून सफाई कामगारांना वारसा हक्काचा अधिकार पूर्ववत प्राप्त करून द्यावा, अशी मागणी केली. याप्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, मनोज मोरे, माजी संघटक संजय वाल्हे, बाळू आगलावे, समाधान शेलार, सफाई कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष हाजी, मुश्ताक शेख, संघटनेचे जगन ताकटे, बापूराव खरात, मुनाफ कादर, वाशिम शेख,सलमान शेख, आरिफ शेख, अंजू बेग, आबिद शेख, मुख्तार शेख, शफिक शेख, शहीद शेख, संजय तपासे, संजय नेरकर, सय्यद रहीम, मधुकर माळी, परवीन नासीर शेख जमील शेख, राकेश भवरे, धर्दीमराज सोनार उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...