आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिसाद‎:कबड्डी, धावण्याच्या स्पर्धेला‎ बिलाडीत मिळाला प्रतिसाद‎

धुळे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नेहरू युवा केंद्र व धुळे तालुक्यातील‎ बिलाडी येथील युवाशक्ती‎ फाऊंडेशनतर्फे तालुकास्तरीय कबड्डी व‎ धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. या‎ स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.‎ स्पर्धेत तालुक्यातील विविध‎ गावातील संघांनी सहभाग घेतला होता.‎ कबड्डीत १९ वर्षाच्या आतील गटात‎ शिवयोद्धा क्रीडा मंडळ (शिरुड), जय‎ भोले क्रीडा मंडळ (धनुर), मार मुसंडी‎ क्रीडा मंडळ (बिलाडी) यांनी अनुक्रमे‎ प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवला.‎ तसेच ४०० मीटर धावण्यात प्रथम‎ क्रमांक भावेश बाविस्कर, द्वितीय‎ अनिकेत धनगर, तृतीय सचिन जाधव‎ यांनी मिळवला.

या वेळी पंचायत‎ समितीचे सदस्य सुभाष पाटील, सरपंच‎ नंदू शिंदे, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र‎ शिंदे, अभिजीत पगारे, योगेश बच्छाव,‎ नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा‎ अधिकारी अशोककुमार मेघवाल,‎ वासुदेव पाटील, परीक्षक यशोदीप‎ पाटील, ऋषीकेश शिरसाठ, सचिन‎ वळवी, कल्पेश वाघ, अरुण देवरे,‎ युवाशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष अक्षय‎ पाटील, समाधान सूर्यवंशी, ललित‎ पाटील, चेतन पाटोळे आदी उपस्थित‎ होते. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी विशाल‎ पिंपळे, मयुर शिंदे, ओमराज शिंदे,‎ संदीप पाटील, अभिषेक अहिरे आदींनी‎ प्रयत्न केले. या स्पर्धेला चांगला‎ प्रतिसाद मिळाला.‎

बातम्या आणखी आहेत...