आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:कळमसरेतील खेळाडू‎ विभाग; राज्यस्तरावर‎

तऱ्हाडी‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर तालुक्यातील कळमसरे‎ येथील उद्यान पंडित बापूसाहेब ग.द.‎ माळी गुरुजी शिक्षण प्रसारक‎ संस्थेच्या आदर्श माध्यमिक‎ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध‎ क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवले.‎ विद्यालयातील विद्यार्थ्यांची विभाग‎ व राज्यस्तवर निवड झाली.‎ त्याबद्दल खेळाडूंचा शाळेत‎ नुकताच सत्कार करण्यात आला.‎ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन‎ सोनवणे अध्यक्षस्थानी होते.

या‎ वेळी मुख्याध्यापक वाय. व्ही.‎ पाटील, सहशिक्षिका व मांडळ‎ येथील वि. का. सोसायटीच्या‎ सदस्या वैशाली सोनवणे, सतीश‎ कोळी, शिवाजी जाधव, वाय. पी.‎ माळी, एन. एस. साळुंखे, व्ही. ए .‎ मोरे, एम. एस. वाडिले, मिलिंद‎ सोनगडे, रमेश माळी, तानाजी‎ रोकडे आदी उपस्थित होते.‎ सहशिक्षिका वैशाली गौरव सोनवणे‎ यांच्या हस्ते राज्यस्तरावर निवड‎ झालेल्या स्वाती सतीश कोळीचा‎ सत्कार झाला. तसेच नाशिक येथे‎ झालेल्या विभागीय मैदानी स्पर्धेमध्ये‎ सहभागी झालेल्या मयूरी प्रवीण‎ अहिरे, मनीषा शांतिलाल कोळी,‎ आरती कोतवाल पावरा, जागृती‎ संतोष कलाल, वैष्णवी मुकेश बुवा,‎ तेजस्विनी अमरीशपुरी बुवा, सागर‎ तेरसिंग पावरा, पीयूष राजेंद्र मराठे‎ यांचाही सत्कार करण्यात आला.‎ क्रीडा शिक्षक अशोक महाजन‎ यांचा संस्थेचे अध्यक्ष मोहन‎ सोनवणे यांनी सत्कार केला.‎

बातम्या आणखी आहेत...