आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरूपण:हनुमंत कथा सुरू होण्यापूर्वी शहरात निघाली कलश यात्रा

धुळे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील श्री त्रिवेणी सत्संग मंडळातर्फे १० ते १७ सप्टेंबर दरम्यान श्री सत‌्गुरू अमृत महाेत्सवानिमित्त श्री हनुमंत कथा सादर होते आहे. त्यानिमित्त कलश यात्रा निघाली. यात्रेत महिला एकाच रंगाच्या साड्या परिधान करून सहभागी झाल्या. मालेगाव राेडवरील गुरुद्वारासमोरील कृष्णा रिसाेर्ट येथे ही कथा होणार आहे. त्यानिमित्त खान्देश गाेशाळेतील हनुमान मंदिरापासून कलश यात्रा काढण्यात आली. श्रीराम जानकी सेवा समिती व नकाणे येथील श्यामसुंदर गाेवर्दन गाे धामचे संस्थापक श्री धाम मिथीलाचे राजीवकृष्णा महाराज निरूपण करतील.

राेज हनुमान यज्ञ, हनुमान बाहुक, कवच, हनुमान अष्टक, बजरंग बाण आदींचे पठण होईल. दुपारी ३ वाजता कथा असेल. त्यानुसार रविवारी हनुमंत अवतरणाची कथा सांगण्यात आली. त्यानंतर आता उद्या साेमवारी (दि.१२) हनुमंताचा बालकाळ, शिक्षण व दीक्षावर, मंगळवारी (दि.१३) श्रीराम भेट, किष्किंधाकाण्ड, बुधवारी (दि.१४) हनुमंताचे पराक्रम, सुंदरकांड चिंतन, गुरुवारी (दि.१५) श्रीराम-रावण युध्द, अहिरावण वध, शुक्रवारी (दि.१६) श्रीराम राज्याभिषेक, लवकुश युध्दावर कथा सांगण्यात येणार आहे. त्यानंतर शनिवारी (दि.१७) पूर्णाहुती, सतगुरू प्रागट्य महाेत्सवाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती डाॅ. सुनील अग्रवाल, सत्यनारायण शर्मा, ताराचंद्र जांगीड, मनाेज जाेशी, हरीश गर्ग यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...