आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणुक:ओसर्ली येथे कानबाईचे भक्तिमय वातावरणात विधिवत विसर्जन

ओसर्ली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे कुलस्वामिनी कानबाई मातेला सोमवारी वाजत-गाजत मिरवणूक काढून निराेप देण्यात आला. या मिरवणुकीदरम्यान महिलांनी घातलेल्या फुगड्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. तर ‘कानुबाई चालनी गंगेवरी व डोंगरले पडी गयी वाट, कपुरणी आरती गजरे लावू’ या गीताने उत्साहात अधिकच भर टाकली. तरुणांनी देखील आनंदात नृत्य करत गाजत मिरवणुकीत सहभाग घेतला.

रविवारी विधिवत स्थापनेनंतर रात्री जागरण करण्यात आले. त्याप्रसंगी ढोल, डफसह गीतांच्या तालावर आबालवृद्धांनी नाचत उत्सवाचा आनंद घेतला. भजनी मंडळांच्या सदस्यांनी कानबाई मातेची भजने गायली. गावात आठ ठिकाणी कानबाई मातेची स्थापना करण्यात आली हाेती. तर साेमवारी मिरवणुकीत ठेका धरत नाचत तापी नदीत साेमवारी दुपारी विधिवत विसर्जन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...