आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोका:खांडबारा जि.प. शाळेत साचले तळे; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

नवापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल का? शाळेभोवती तळे साचून सुटी मिळेल का? हे बालगीत आपण शाळेत असताना म्हटले आहे. त्याचीच प्रचिती तालुक्यातील खांडबारा जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणातील दृश्य पाहून येत आहे. त्यामुळे ‘सांग सांग भोलानाथ, शाळेतील पावसाचे पाणी काढायला सद्बुद्धी देशील का? आमचे आरोग्य चांगले राहू देशील का? असे म्हणण्याची वेळ इथल्या चिमुकल्यांवर आली आहे.

तालुक्यातील सर्वात मोठी तीन भाषिक जिल्हा परिषद शाळा खांडबारा येथे आहे. मराठी, उर्दू आणि गुजराती अशा तीन माध्यमांच्या या शाळेत शेकडो विद्यार्थी शिकत आहेत. १९९० च्या दशकापासून दरवर्षी या जि.प. शाळेच्या पटांगणात पाणी साचते. विद्यार्थ्यांना शाळेत तसेच वर्गात जाण्यासदेखील मोठी कसरत करावी लागते. पाण्याच्या डबक्यातून विद्यार्थी कशीतरी वाट काढत शाळेत जातात. या संदर्भात संबंधित विभागाने कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नाही. विद्यार्थी डबक्यातून येत असल्याचे पाहून शिक्षक स्वतः या पाण्याचा निचरा कसा होईल, यासाठी स्वतः काम करून पाणी काढण्याचा प्रयत्न करतात; परंतु पाणी कायमस्वरूपी साचू नये, यासाठी जि.प.कडून उपाययोजना होत नाही.