आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा‎:शहरात खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा‎

धुळे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक सेवा‎ संचालनालयातर्फे शहरात तब्बल‎ १८ वर्षांनतर खाशाबा जाधव चषक‎ राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा होणार‎ आहे. नियोजनासाठी उद्या बुधवारी‎ जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या‎ उपस्थितीत बैठक होईल.‎ कुस्तीगिरांसाठी खाशाबा जाधव‎ चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा‎ महत्त्वाची असते. या स्पर्धेची‎ नुकतीच घोषणा झाली. ही स्पर्धा‎ पूर्वी राष्ट्रीय पातळीवर होत होती.‎ कालांतराने तिचे राज्यस्तरीय स्पर्धेत ‎रूपांतर झाले.

यापूर्वी सन‎ २००३-२००४ मध्ये ही स्पर्धा धुळ्यात ‎ ‎ झाली होती. स्पर्धेत फ्री स्टाइल‎ गटात १०० पुरुष, ग्रीको रोमन गटात‎ १०० पुरुष तर फ्री स्टाइल गटात १०० ‎ ‎ महिला कुस्तीगीर सहभागी होतील. स्पर्धेचे उद्‌घाटन क्रीडामंत्र्यांच्या ‎उपस्थितीत करण्याचे नियोजन‎ आहे. स्पर्धेसाठी ५० लाख रुपये‎ अनुदान मिळेल. शहरातील गरुड ‎ ‎ मैदानात ही स्पर्धा होईल. ही स्पर्धा‎ तीन गटात होईल. त्यात फ्री स्टाइल‎ गट व ग्रीको रोमन गटातील‎ विजेत्यांना प्रथम पारिताेषिक ७५‎ हजार, द्वितीय ५० हजार, तृतीय २५‎ हजार रुपये असेल. अन्य सहा‎ गटांसाठी प्रथम बक्षीस ४० हजार,‎ द्वितीय ३० हजार, तृतीय २० हजारांचे‎ पारितोषिक देण्यात येईल. स्पर्धेत‎ सहभागासाठी प्रत्येकी ४ हजार रुपये‎ दिले जातील. महिलांच्या गटातील‎ विजेत्याला प्रथम बक्षीस ५० हजार,‎ द्वितीय ४० हजार तर तृतीय १५ हजार‎ रुपये देण्यात येईल.‎

कुस्ती क्षेत्राला संजीवनी‎
महाराष्ट्र केसरी प्रमाणे लोकप्रियता‎ प्राप्त असलेली ही स्पर्धा‎ कुस्तीगिरांसाठी महत्त्वाची असते.‎ शहरात पाच दिवस ही स्पर्धा होणार‎ आहे. शालेय गटातील खेळाडूंना या‎ स्पर्धेत सहभागी होता यावे या‎ उद्देशाने मार्च किंवा एप्रिल महिन्यात‎ ही स्पर्धा घेण्याची मागणी आहे.‎

बातम्या आणखी आहेत...