आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:तळोदा शहर काँग्रेसला खिंडार; तीन नगरसेवक लागले भाजपच्या गळाला

तळोदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे माजी प्रभारी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक गौरव वाणी, माजी नगराध्यक्षा रत्ना चौधरी यांचे पती व विद्यमान नगरसेवक सुभाष चौधरी आणि काँग्रेसचे नगरसेवक सतीवान पाडवी, बाजार समितीचे माजी संचालक भरत चौधरी, शिवसेना गटातील युवा सेनेचे देवा कलाल यांचाही प्रवेश होणार असल्याचे वृत्त असून त्यास नगरसेवक वाणी यांनी दुजोरा दिला.

भाजपत प्रवेश करणारे तिन्ही नगरसेवक हे माजी मंत्री पद्माकर वळवी व माजी नगराध्यक्ष भरत माळी यांच्या नेतृत्वावर विश्वास असणारे मानले जातात. तालुक्यातील काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांचाही भाजप प्रवेशाबाबत चर्चा असून पक्षातील अजून कोण पदाधिकारी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपत प्रवेश करतात, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून आहे.

येथील पालिका निवडणुकीत गौरव वाणी हे सलग दुसऱ्यांदा काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडले. तर सुभाष चौधरी हे भरत माळी यांच्या गोटातून स्वीकृत नगरसेवकही होते. मागील काळापासून नगरसेवक वाणी हे भाजपत प्रवेश करतील, अशी चर्चा होती. परंतु काँग्रेसचे दुसरे नगरसेवक सुभाष चौधरी यांच्याबाबत साशंकता होती. तिन्ही नगरसेवकांचा प्रवेश हा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

पालिका निवडणुकीसाठी संघटनात्मक नियाेजन नाही
या संदर्भात गौरव वाणी व इतरांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात व शहरात विशेषत: नगरपालिका निवडणुकीच्या पूर्वी संघटनात्मक कोणतेही नियोजन दिसत नाही. आगामी काळात विकासाच्या प्रमुख मुद्द्यावर जिल्ह्यातील भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...