आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:राज्यपाल महोदय, कंगनाप्रमाणे कृषिकन्येलाही भेटा, कृषिकन्या प्रियंका जोशीचे राज्यपाल कोश्यारींना पत्राद्वारे साकडे

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतकऱ्यांची आर्त हाक केंद्रापर्यंत पोहोचवाल ही अपेक्षा

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. या कोरोनाच्या संकटकाळातही राज्यातील राजकीय व्यक्ती, कलाकारांना आपण आपला बहुमूल्य वेळ दिला. चर्चा केली, समस्या, प्रश्नही जाणून घेतले. अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे प्रश्नही मोठ्या प्रमाणावर आहेत. यामुळे कंगना रनौतप्रमाणे आपण कृषिकन्येलाही भेटीसाठी वेळ द्यावा, अशी विनंती प्रियंका जोशी या शेतकरी कन्येने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

धुळे जिल्ह्यातील विटाई (ता.साक्री) येथील प्रियंका जोशी या शेतकऱ्याच्या मुलीने राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या आहेत. या पत्रात तिने लिहिले की, कोरोनाच्या भयानक संकटात आम्हाला दोन घास मिळतील का, हा मोठा प्रश्न होता. परंतु शेतकऱ्यांमुळे संपूर्ण देशात अन्नाचा प्रश्न जाणवला नाही. कोरोनाने उद्भवलेल्या संकटातून देश पुन्हा उभा करायचा असेल, तर ते काम शेतकरीच करू शकतो. परंतु यासाठी आधी शेतकऱ्याला उभारी देणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने २ लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी देऊन आपल्या परीने प्रयत्न केला आहे. मात्र केंद्र सरकारनेही शेतकऱ्याला उभारी देण्याची जबाबदारी घ्यायला हवी. महाराष्ट्र सरकारने २ लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी केल्यानंतर आता पुढील कर्जमाफी करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असल्याचे प्रियंकाने म्हटले आहे.

शेतकऱ्यांची आर्त हाक केंद्रापर्यंत पोहोचवाल ही अपेक्षा
शेतकऱ्याच्या मुलांचे शैक्षणिक प्रश्न व केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घातलेली बंदी उठवण्याबाबत चर्चा करण्यासाठी तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ देऊन शेतकऱ्यांची आर्त हाक केंद्रापर्यंत पोहोचवाल, अशी आशा प्रियकांने व्यक्त केली. तसेच कंगना रनौतने आपली भेट घेतल्यानंतर राज्यपालांनी मला मुलीसारखी वागणूक दिल्याची प्रतिक्रिया तिने दिली. याप्रमाणेच या शेतकऱ्याच्या लेकीलाही आपण वेळ द्यावा, अशी मागणी तिने केली आहे.