आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-केवायसी:सन्मान निधीसाठी 77% शेतकऱ्यांतर्फे केवायसी

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील ७७ टक्के लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून, अद्याप २३ टक्के लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तातडीने ई-केवायसी प्रक्रिया करावी. जे शेतकरी ही प्रक्रिया पूर्ण करणार नाही, त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली.

ई-केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांनी https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावरील फार्मर कॉर्नर टॅबमध्ये किंवा पीएम किसान ॲपमध्ये ओटीपीद्वारे प्रमाणिकरण करावे. ग्राहक सेवा केंद्रातही ही प्रक्रिया नाममात्र शुल्कात बायोमेट्रिक पद्धतीने करता येणार आहे. आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यातच योजनेची रक्कम जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...