आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:श्रमदान, आपत्ती व्यवस्थापनाचे धडे, रक्तदान करत फेडले ऋण; राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे रावेरला श्रमसंस्कार शिबिर

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मा. ध. पालेशा वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर धुळे तालुक्यातील रावेर येथील जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आले. या शिबिरांतर्गत आठ दिवसांत विविध जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात आले. गावात श्रमदान शिबिर झाले. तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले.

शिबिराचे उद‌्घाटन स्वातंत्र्यसैनिक राधेश्याम पोद्दार, पवन पोद्दार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रावेरचे उपसरपंच बापू मराठे, सामाजिक कार्यकर्ते छोटू देवरे, प्राचार्य डॉ. पी. पी. छाजेड, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. बी.बी. बारसे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. बी.एस. काळे, ग्रंथपाल प्रा. डॉ. सी.डी. वाणी उपस्थित होते. शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांचे सात गट करण्यात आले होते. त्यांच्यावर सात दिवसांत कोणते कार्यक्रम घ्यावयाचे याची जबाबदारी दिली गेली. दुसऱ्या दिवशी गावात श्रमदानातून बंधारा बांधण्यात आला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांचे माझी वसुंधरा अभियानावर व्याख्यान झाले. संतोष नेरकर यांनी स्वच्छ भारत अभियान, घनकचरा व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. जि्ल्हा परिषद शाळेतील शिक्षक उमेश खैरनार यांनी शिक्षण हक्का कायद्याची माहिती दिली. विकेश अहिरे, अॅड.जितेंद्र निळे यांनी महिला सुरक्षा व कायद्यांची माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.प्रमोद पाटील, विभागीय समन्वयक प्रा. डॉ. दत्ता ढाले यांनी शिबिराला भेट दिली. आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमात व्यवस्थापन कक्षाचे प्रशिक्षक मोहनीश वाडेकर कल्पेश बोरसे, चेतन उपाध्याय यांनी मार्गदर्शन केले. आपत्तीपासून कसा बचाव करावा याबात प्रात्यक्षिक करून दाखवले. सिकलसेलबाबत जिल्हा समन्वयक विलास वारुडे यांनी व जिल्हा समुदेशक दौलतराव मोरे यांनी मार्गदर्शन केले. सर्व स्वयंसेवकांची सिकलसेल चाचणी घेण्यात आली. नंदा भवानी देवस्थानची स्वच्छता करण्यात आली. जिल्हा परिषद शाळाही स्वच्छ करण्यात आली. महिला बालकल्याण समितीचे सदस्य संदेश शिरसाठ, निवृत्त उपनिरीक्षक रतन जाधव, भजनी मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ देवरे, गाेपीनाथ देवरे, उपसरपंच माधवराव मराठे, सदस्य विनायक पवार, माजी सरपंच श्रीराम दळवे, अनिल शिरसाठ, व्यायामशाळेचे अध्यक्ष संजय शिरसाठ आदी उपस्थित होते.

विविध विषयांवर प्रबोधन
रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात १३ जणांनी रक्तदान केले. गावात पथनाट्यातून प्रबोधन करण्यात आले. गावातील विविध चौकात पथनाट्य सादरीकरण केले गेले. रक्तदान श्रेष्ठदान या विषयावर हिरे मेडिकल कॉलेजचे प्रा.डॉ.कुणाल सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.हेमंत जोशी यांनी रक्तदान केले.

बातम्या आणखी आहेत...