आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अहिल्यापूरला पाय विहिरीची श्रमदानातून सफाई; पुरातत्त्व विभागाने लक्ष दिल्यास प्राचीन बारवांचे संवर्धन होण्यास होणार आहे मदत

धुळे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर येथील ऐतिहासिक पायविहीरीच्या स्वच्छतेसाठी स्थानिक ग्रामस्थांनी श्रमदान मोहीम राबवली. जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांनी या विहिरीची पाहणी केली होती.खान्देशातील पाय विहिरaींना सुमारे चारशे ते पाचशे वर्षांची परंपरा आहे.

तसेच काही बारव या बाराव्या व तेराव्या शतकातील असल्याचे जाणकार सांगतात. या विहिरी स्वतःबरोबर परिसरातील इतर विहिरी आणि नद्या, नाले, ओढ्यांना जिवंत ठेवण्याचे काम करतात. शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर येथे प्राचीन पायविहीर आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात या विहीरीचे बांधकाम झाले आहे.

जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांनी अहिल्यापूर येथे जाऊन विहिरीची पाहणी केली. त्यावेळी परिसरात अस्वच्छता दिसून आल्याने त्यांनी विहिरीची स्वच्छता करण्याची सूचना दिली होती. या वेळी सरपंच संग्रामसिंग राजपूत, ग्रामसेवक रमेश जाधव यांनी विहिरीची माहिती दिली. तसेच विहिरीची श्रमदानातून स्वच्छता केली. विखरण येथील भवानी मंदिरासमोरही पायविहीर आहे. या विहीरीचीही पवार यांनी पाहणी केली. याशिवाय चांदपुरी आणि करवंद येथेही बारव आहे. पुरातत्त्व विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...