आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलनाचा पवित्रा:तळोद्यात नव्या वसाहतीत सुविधांचा अभाव; विकासाबाबत सापत्नभाव

तळोदा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नवीन वसाहतींमध्ये अनेक वर्षे होऊनदेखील मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित आहेत. तसेच सध्या नवीन वसाहतींमध्ये पालिकेने रस्ते व गटारींचे काम आधी घेतले असून, त्यातील काही नवीन वसाहती या आमच्या वसाहती निवासी जागा म्हणून मंजूर झाल्यानंतरच्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी आधी रस्त्यांचे काम कसे काय सुरू आहेत? असा जाब पालिकेला विचारणारे निवेदन नवीन वसाहतीमधील नागरिकांनी दिले. तसेच आमच्या वसाहतींमध्येही तत्काळ कामे सुरू करा, अन्यथा आंदाेलनाचा इशारा दिला आहे.

शहरातील काही वसाहती जुन्या असून, त्यानंतर स्थापित झालेला काही नवीन वसाहतीमध्ये पालिकेने विकास कामे कोणत्या आधारावर घेतली? मुख्याधिकारी व सत्ताधारी गटानेही ही कामे मंजूर कशी केली? यासंदर्भात योग्य तो खुलासा होणे आवश्यक असल्याचेही या निवेदनात नमूद केले आहे. नवीन वसाहतींमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी नसल्याने ठिकठिकाणी शोषखड्डे केले आहेत. ते भरले असून, नवीन शोषखड्डे करण्यासाठी जागाच शिल्लक उरलेली नाही. पावसाळ्यामध्ये काही घरापर्यंत जाण्यासाठी देखील रस्ते नसल्याने अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. शालेय विद्यार्थी. ज्येष्ठ नागरिक, आजारी रुग्ण यांना दवाखान्यात नेण्यापर्यंत संकटाचा सामना मागील अनेक वर्षांपासून करावा लागत आहे. याबाबत बांधकाम सुरू करण्यापूर्वी पालिकेला आवश्यक तो कर नियमितपणे भरताे मात्र तरी सुविधांपासून वंचित का आहोत? अशी पृच्छा या निवेदनातून नागरिकांनी केली आहे.

त्वरित कामे मंजूर करून सुरुवात करण्याची गरज
या पूर्वीही दोन वेळा निवेदन देऊन समस्यांबाबत नगरपालिकेला अवगत करण्यात आले आहे. या भागात त्वरित कामे मंजूर करून कामाला सुरुवात करावी. अन्यथा आम्ही नगरपालिकेचे कोणतेही कर भरणार नाही. तसेच रस्त्यावर उतरून पालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढू, असा इशारा या नागरिकांनी दिला आहे. गेल्या कित्येक वर्षांत विकासाची कामे न झाल्याने नागरिक आधीच त्रस्त आहेत. त्यात सापत्नभाव दाखवला जात असल्याने त्यांचा संताप हाेत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या पुढाकाराची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...