आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय:प्रभाग एक, दोनमध्ये रस्त्यांचा अभाव, पाण्याचे नियोजन नसल्याने गैरसोय

धुळे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या पूर्वेला असलेल्या देवपूरातील नगावबारी परिसरापासून शहर हद्दीला सुरूवात होते. या भागातील जुन्या आग्रारोडच्या डाव्या बाजूला प्रभाग क्रमांक एक तर उजव्या बाजूला प्रभाग क्रमांक दोन आहे. नगावबारी, आकाशवाणी केंद्र, केंद्रीय विद्यालयापर्यंत या प्रभागांचा विस्तार झाला आहे. मात्र, या परिसरात अनेक वर्षापासून राहत असलेल्या नागरीकांना अद्यापही रस्ते, सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारीच्या सुविधा उपलब्ध नाही. तसेच पाणीपुरवठ्याचजन होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिक वारंवार तक्रार करतात पण उपयोग होत नाही. नवीन पाणीपुरवठा योजना व भूमीगत गटार योजनेच्या कामामुळे परिसरातील रस्त्यांची वाट लागली आहे.

शहराचा विस्तार देवपूर भागात झपाट्याने होतो आहे. त्यात वलवाडीचा समावेश शहरात झाला असून या परिसरात अनेक वसाहती आहे. एक लाखापेक्षा अधिक नागरिक या भागात राहतात. परिसरतील अनेक वसाहती जुन्या असून या भागात राहणाऱ्या नागरिकांना अद्यापही पुरेशा सुविधा मिळत नाही. परिणामी नागरीकांना त्रास सहन करावा लागत असल्याची स्थिती आहे.

एकवीरा देवी विद्यालयात जाणून घेणार समस्या
गेल्या पाच ते दहा वर्षात काही ठिकाणी गटारी, रस्त्यांची सुविधा झाली. मात्र, गेल्या तीन वर्षात नवीन पाणीपुरवठा योजना आणि भूमीगत गटार योजनेच्या कामांमुळे परिसरातील रस्ते खोदण्यात आले आहे. या रस्त्यांचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. अनेक कॉलन्यांमध्ये कच्चे रस्ते आहेत. त्यामुळे पावसाळ्यात नागरीकांना त्रास सहन करावा लागतो.

त्यानंतर महापालिका प्रशासन याविषयाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर दिव्य मराठीतर्फे नागरिकांना त्यांच्या समस्या मांडता याव्यात यासाठी रूबरू उपक्रम राबवण्यात येणार आहे. हा उपक्रम १९ जूनला सकाळी साडेदहा वाजता देवपूरातील एकवीरा देवी विद्यालयात होणार आहे. या वेळी प्रभाग क्रमांक एक व दोनच्या नागरिकांना त्यांच्या समस्या मांडता येतील.या वेळी महापालिकेचे अधिकारी व नगरसेवकही उपस्थित राहणार आहेत.

पाण्याचा प्रश्न गंभीर : याशिवाय परिसरातील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. या भागात आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांना पाणीटंचाईच्या समस्येला बाराही महिने सामोरे जावे लागते. तसेच अनेक ठिकाणी पथदिवे, अस्वच्छता आहे. घंटागाडी वेळेत येत नाही. याविषयाकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी अनेकवेळा आंदोलन केले पण उपयोग झालेला नाही. प्रभाग क्रमांक एक व दोनमधील ७० टक्के भागात मुलभूत नागरी सुविधा उपलब्ध नाहीत. करमणूकीसाठी कुठेही चांगले उद्यान, नानानानी पार्कही नाही.
-----------------

बातम्या आणखी आहेत...