आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:धुळयातील हॉटेलमधून नववधूचे दागिने लंपास; मुलाने दिवसभर रेकी करून लांबवली 6 लाखांची बॅग

धुळे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरापासून जवळ अवधान शिवारात असलेल्या हॉटेल्समधून नववुधचे दागिने, रोकड, डायमंडच्या मंगळसूत्रासह सुमारे ५ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल अल्पवयीन मुलाने अवघ्या काही वेळात लांबवला. सीसीटिव्ही फुटेजमध्ये हा प्रकार टिपण्यात आला आहे. घटनेच्या वेळी हॉटेलमध्ये संगीत रजनी कार्यक्रम सुरू होता. मोहाडी पेालिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

अवधान शिवारात हॉटेल टॉपलाईन आहे. या ठिकाणी शहरातील कापड व्यापारी अभिषेक अग्रवाल यांचे बंधू आदित्य यांचा विवाह हेाणार होता. त्यासाठी वर-वधू पक्षाचे नातलगही सहभागी झाले होते. या वेळी ही चोरी झाली.

मुलाचा शोध, पथक रवाना
सध्यातरी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन मुलाच्या हालचाली संशयास्पद असल्याचे सीसीटिव्हीत दिसते.वरवधु पक्षाकडे विचारणा केल्यावर मुलगा नात्यातील नसल्याचे समोर आले. सध्या मुलाचा शोध सुरू आहे. त्यासाठी पथक रवाना झाले आहे.
भूषण कोते, पोलिस अधिकारी

बातम्या आणखी आहेत...