आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबोरविहीर ते नरडाणा रेल्वेमार्गासाठी धुळे आणि शिंदखेडा तालुक्यात २०० हेक्टर भूसंपादन होईल. त्यासाठी जमीन मोजणीचे काम जुलै महिन्यात सुरू होणार आहे. दोनशे हेक्टर जमीन पारंपरिक पद्धतीने मोजण्यासाठी तीन महिने लागले असते पण रोव्हर यंत्राच्या मदतीने हे काम एक महिन्यात करण्याचे नियोजन आहे. रोव्हर मशीनचा वापर करण्यासाठी जिल्ह्यातील २४ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.
मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्ग धुळे ते चाळीसगाव रेल्वेमार्गाला धुळे तालुक्यातील बोरविहीरजवळ छेदतो. बोरविहीर ते नरडाणा रेल्वे मार्गामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्ग जोडले जातील. त्यामुळे पहिल्या टप्प्यात बोरविहीर ते नरडाणा रेल्वेमार्गाचे काम होणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. धुळे तालुक्यातील १९ व शिंदखेडा तालुक्यातील ५ गावातून २०० हेक्टर जमीन संपादित होणार आहे. भूसंपादनासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. जमिनी मोजणीचे काम जुलै महिन्यात सुरू होईल. हे काम रोव्हर यंत्राच्या मदतीने होईल. जिल्ह्याला पाच रोव्हर यंत्र उपलब्ध झाले आहे. या यंत्राचे काम कन्टिन्युअसली ऑपरेटिंग रेफरन्स सिस्टिमच्या माध्यमातून चालेल. या केंद्राचा संपर्क थेट उपग्रहाशी असेल. त्यामुळे जमिनीची अचूक मोजणी होईल. रोव्हर मशीनमुळे हे काम एक महिन्यात होईल.
विक्रमी वेळेत जमीन मोजणीचे काम पूर्ण करणार
रोव्हर यंत्र चालवण्याचे २५ जणांना प्रशिक्षण दिले आहे. इन हाऊस आणि फिल्डवर प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रेल्वेमार्गासाठी जमीन मोजणीला सुरुवात होणार आहे. ही मोजणी विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी पाचही मशीनचा वापर करण्यात येईल. एक महिन्यात काम पूर्ण केले जाईल.
-प्रशांत बिलोलकर, जिल्हा अधीक्षक, भूमिअभिलेख कार्यालय
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.