आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पहिल्या ‘तंगा मंगाना दंगा’ अहिराणी नाटकाचा शुभारंभ ; खासदार भामरे यांची उपस्थिती

कापडणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिरात जलरंग तापी, मुंबई या संस्थेतर्फे प्रसिद्ध लेखक तथा साहित्यिक बापूसाहेब हटकर लिखित व मनोहर खैरनार दिग्दर्शित अहिराणीतील पहिले वहिले धम्माल विनोदी अहिराणी लोकनाट्य ‘तंगा मंगाना दंगा’ चा शुभारंभ प्रयोग झाला. या नाटकाच्या उद्घाटनाला खासदार डॉ. सुभाष भामरे उपस्थित होते. या वेळी मंचावर खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील, उपाध्यक्ष एन.एम. भामरे, कार्याध्यक्ष तथा लेखक बापूसाहेब हटकर उपस्थित होते. बापूसाहेब हटकर लिखित ‘तंगा मंगाना दंगा‘ हे नाटक म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल व संस्कृतीचा सुंदर आविष्कार असून या नाटकाच्या निर्मात्या संगीता कुळकर्णी-हटकर आहेत. तर शाहीर शिवाजीराव पाटील यांच्या पहाडी आवाजाची उत्तम साथसंगत लाभली आहे. दिग्दर्शक मनोहर खैरनार यांनीही हे नाटक उत्तमप्रकारे दिग्दर्शित केले असल्याने या नाटकातून खान्देशाचे अंतरंग उलगडण्यास मदत होते. विशेष म्हणजे या नाटकासाठी १६ कलाकार व इतर पडद्यामागील ६ कलाकार असे एकूण २२ कलाकर, लेखक आणि दिग्दर्शक हे कोरोना महामारीच्या काळात गेली दोन वर्षे ऑनलाइन सराव करत होते. नाटकातील गीते, संगीत व नृत्य अतिशय दमदार असल्याने या नाटकाच्या जमेच्या बाजू आहेत. या नाटकातून दिलेला संदेश खान्देशातील प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा आहे. या नाटकाचा शुभारंभ प्रयोग पाहण्यासाठी गीतकार व संगीतकार विश्राम बिरारी, साहित्यिक प्रा.डॉ.सदाशिव सूर्यवंशी, नाटककार प्रा.अनिल सोनार, खान्देश हितसंग्रामचे जिल्हाध्यक्ष लीलाधर सोनार, नरेंद्र देवरे, भूषण वडनेरे यांच्यासह धुळेकर रसिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. त्यांना नाटकातील कलावंतींनी चांगलेच हसवले. यामुळे हा प्रयोग निश्चितच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले, अशा प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या.

नाटकात यांनी साकारल्या भूमिका नाटकात प्रशांत महाजन, भटू चौधरी, सुरेश अंतुर्लीकर, भारत पवार, नीलेश जोशी, कुणाल शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, सौरभ राठोड, संजय विसपुते, भूषण कुंभार, अक्षय शिंदे, किरण चौधरी, प्रीती मिश्रा, संगीता माळी, अस्मिता पाटील, भाग्यश्री पाटील, रूपाली तांदूळकर, समीक्षा मुंडे, भागवत महाजन, कुणाल राऊत, मोरे मास्तर, भूषण पवार यांनी भूमिका साकारल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...