आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:वाटपात आघाडी; जिल्हा बँकेचा लवकरच गौरव

धुळे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात खरीप हंगामात राष्ट्रीयीकृत व खासगी बँकेच्या तुलनेत धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जास्त कर्ज वाटप केले. बँकेने अल्प व अत्यल्प भूधारक २१ हजार ६३९ शेतकरी सभासदांना १९० कोटींच पीककर्ज वाटप केले. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन व पदाधिकारी, अधिकारी व सर्व शाखांचे मॅनेजर, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन तसेच सचिवांचा कृषी समितीच्या मासिक सभेत गौरव करण्याचा ठराव करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची मासिक सभा कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संग्राम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत शेतकऱ्यांच्या हिताचे दोन ठराव सर्व संमतीने मंजूर करण्यात आले. आदिवासी व मागासवर्गीय शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी महावितरणकडून जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध होणार आहे. याविषयीची माहिती उपकार्यकारी अभियंता प्रशांत कोल्हे यांनी दिली. कृषी पंपाच्या विद्युत कनेक्शनसाठी जिल्ह्यातील आदिवासी व मागासवर्गीय शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केले. जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांनी कृषी पंपांना विद्युत कनेक्शन योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन झाले.

बातम्या आणखी आहेत...