आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठ्याला विलंब:जलवाहिन्यांच्या गळत्या तीन भाग करून काढणार

धुळे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विविध भागातील जलवाहिन्यांना वारंवार गळत्या लागतात. तक्रार केल्यावरही गळत्या बंद केल्या जात नाही. हा प्रकार टाळण्यासाठी आता शहराचे तीन भाग करून गळत्या काढण्यासाठी ठेकेदार नेमला जाणार आहे. शहरात अनेकवेळा तांत्रिक कारणामुळे पाणीपुरवठ्याला विलंब होतो. मध्यंतरी काही दिवस आठ दिवसानंतर शहरात पाणीपुरवठा होत होता. आता काही दिवसांपासून चार ते पाच दिवसांनंतर पाणी मिळते आहे. ही स्थिती असली तरी शहरातील अनेक भागातील जलवाहिन्यांना गळती लागली आहे.

त्यामुळे पाण्याची नासाडी होते आहे. तसेच काही भागात दूषित पाणीपुरवठा होतो. जलवाहिन्यांची गळती काढण्यासाठी एकच ठेकेदार नेमण्यात आला आहे. एकाच वेळी तीन ते चार ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली तर ठेकेदाराला काम करणे शक्य होत नाही. साधन सामग्री व कर्मचाऱ्यांच्या मर्यादा येतात.

त्यामुळे गळती दुरुस्तीला वेळ लागतो. ही तांत्रिक अडचण लक्षात घेऊन आता प्रशासनाने शहराचे तीन भाग करून तिन्ही भागासाठी स्वतंत्र निविदा काढण्याचे ठरवले आहे. त्यामुळे जलवाहिन्यांची तातडीने दुरुस्ती होण्यास मदत होणार आहे. पुढील आठवड्यात निविदा प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...