आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघ्यांची तोबा गर्दी:पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या विहिरीत पडला; बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या विहिरीत पडल्याची घटना धुळ्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर नजीक धवळीविहीर येथे घडली आहे. या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. दहिवेल परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत होती. विहिरीला कडा नसल्यामुळे बिबट्या पाण्याच्या शोधात रात्री दोन वाजेच्या सुमारास विहिरीत पडला असावा असा अंदाज वर्तवला आहे. त्या बिबट्याला विहिरीतून बाहेर निघात येत नाहीये तर त्याला बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.

बिबट्या बाहेर काढण्यासाठी वनविभागाचे टीम घटनास्थळी पोहचली आहे. पाण्यात बिबट्या पडल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे. सुटका कशी केली जाते ते पहावे लागणार आहे. विहिरीतून बाहेर पडण्यासाठी बिबट्या धडपड करीत आहे. विहीर खोल असल्याने बिबट्याचे प्रयत्न असफल झाले आहेत. विहिरींमध्ये पाणी जास्त आहे. त्यामुळे त्याला लवकरात लवकर बाहेर काढवे त्याची सुटका करणे गरजेच आहे.

साक्री तालुक्यातील पिंपळनेर नजीक मैदाने गावांमध्ये दोन बिबट्यांनी धुमाकूळ घालत होता. गेल्या काही दिवसापासून परिसरातील नागरिकांना हैराण करून सोडले होते. अनेक पशु फस्त केल्याचा घटना घडल्या आहेत. बिबट्या विहिरीत पडून अकरा तास झाले असून त्याला बाहेर काढण्यासाठी साक्री वन विभागाचे टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी पिंजरा देखील टाकण्यात आला आहे. लवकरच बिबट्याला सुखरुप बाहेर काढण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...