आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टंचाईच्या झळा:गेल्या वर्षापेक्षा यंदा जलसाठा कमीच; 49 गावांत विहीर अधिग्रहण, एका गावात टँकर

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये असलेल्या पाण्याचे वेगात बाष्पीभवन होते आहे. त्यामुळे जलसाठा घटतो आहे. मध्यम आणि लघु प्रकल्पांत यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी जलसाठा आहे. तसेच आगामी काळात काही गावांमध्ये टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. तसेच ४९ गावांत विहीर अधिग्रहण, एका गावात टँकर सुरू झाला आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी सरासरीच्या तुलनेत १२० टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे मध्यम प्रकल्पांत ६० तर लघु प्रकल्पात ९३ टक्के जलसाठा झाला होता. पाण्याचा सिंचनासाठी वापर झाल्याने मार्च महिन्याच्या प्रारंभापर्यंत ५० टक्के जलसाठा शिल्लक होता. पण होळीनंतर तापमानात प्रचंड वाढ होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने १८ एप्रिलपर्यंत जलसाठा ३४.७४ टक्क्यांवर आला. गेल्या पंधरा दिवसांत बाष्पीभवनामुळे जलसाठा ३.११ टक्के कमी झाला. सद्यःस्थितीत मध्यम आणि लघु ३१.६३ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी या कालावधीत तो ३५.४१ टक्के होता. शिवाय उन्हाची तीव्रताही कमी होती. जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत आता फक्त २७.४ टक्के मध्यम प्रकल्पांत ३३.१३ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येते आहे.

नकाणे तलावात फक्त ३७ टक्के साठा शिल्लक
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलावात आता केवळ ३७.८८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच काळात ५३.९ टक्के जलसाठा शिल्लक होता. सुलवाडे बॅरेजमध्ये क्षमतेच्या तुलनेत ४२.१ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी याठिकाणी ४४.३७ टक्के जलसाठा होता.

टँकरसाठी आठ प्रस्ताव : जिल्ह्यात सन २०२० आणि २०२१ या दोन वर्षात टँकर सुरू करावे लागले नव्हते. मात्र, यंदा उन्हाची तीव्रता जास्त असल्याने टँकरची मागणी वाढली आहे. नव्याने ८ गावात टँकर सुरू करण्यासाठी महसूल प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...