आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना संधी:स्वच्छतेसाठी शाळांमध्ये ‘लेटस् चेंज’ उपक्रम; अस्वच्छता करणाऱ्यांवर नजर

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती व मिशन स्वच्छ भारत मिशनचा वर्धापन दिन २ ऑक्टोबरला झाला. त्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाने ‘लेटस् चेंज’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत अस्वच्छता करणाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी शाळांमध्ये स्वच्छता मॉनिटर नियुक्त करण्यात येणार आहे.

निष्काळजीपणे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सवय अनेकांच्या अंगवळणी पडली आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक अस्वच्छता करणाऱ्यांना त्याच क्षणी त्यांनी केलेल्या चुकीची जाणीव करून देण आवश्यक असते. ही बाब लक्षात घेऊन आता जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये ‘लेटस् चेंज’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत स्वच्छता मॉनिटर नेमले जाणार आहे. शाळेत कुठेही स्वच्छतेविषयी निष्काळजीपणा होत असल्याचे आढळल्यास स्वच्छता मॉनिटर हा प्रकार निदर्शनास आणून देतील.

या उपक्रमांतर्गत पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर केले जाणार आहे. स्वच्छता मॉनिटरची जबाबदारी घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे सफाई कर्मचाऱ्यांवरील भार कमी होण्यास मदत होईल. जास्तीत जास्त स्वच्छता मॉनिटरांना सक्रिय करणाऱ्या शाळांना सन्मानित केले जाईल. याविषयीची माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांसोबत जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी सिद्धार्थ नगराळे समन्वय साधतील. सर्व शाळांना व्हिडीओ लिंक शेअर करून या प्रकल्पाची माहिती दिली जाईल. दरम्यान, स्वच्छ भारत मिशनतंर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येता आहे. स्वच्छतेवर जनजागृती केली जाते आहे.

बातम्या आणखी आहेत...