आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई‎:247 वाहन चालकांचे‎ लायसेन्स तीन महिने रद्द‎

धुळे‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाहतुकीचे नियम पायदळी‎ तुडवणाऱ्या २४७ वाहन चालकांचे‎ लायसेन्स आरटीओ विभागाने तीन‎ महिन्यांसाठी रद्द केले आहे. बेशिस्त‎ वाहन चालकांना चाप लागावा या‎ उद्देशाने हा निर्णय झाला आहे.‎ वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन‎ करणाऱ्यांची संख्या मोठी असून‎ दरवर्षी त्यात वाढच होते आहे. या‎ प्रकाराला आळा बसावा यासाठी‎ जिल्ह्यासह शहरातील २४७ वाहन‎ चालकांचा वाहन चालवण्याचा‎ परवाना तीन महिन्यांसाठी रद्द‎ करण्यात आला आहे.

त्यात‎ दुचाकी, चारचाकी व अवजड‎ वाहन चालकांचा समावेश आहे.‎‎‎‎‎‎‎‎‎याविषयीचा प्रस्ताव शहर वाहतूक‎ शाखा व पोलिस दलाने प्रादेशिक‎ परिवहन विभागाला पाठवला होता.‎ त्यानंतर आरटीओ विभागाने ही‎ कारवाई केली. शहर वाहतूक‎ शाखेने १ एप्रिल २०२२ ते २८‎ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत‎ बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई‎ केली होती. या कारवाईतील वाहन‎ चालकांचे लायसेन्स रद्द झाले आहे‎

का केली कारवाई‎
पोलिसांच्या माहितीनुसार विना‎ हेल्मेट, मद्यपान करून वाहन‎ चालवणे, चालत्या वाहनांवर‎ मोबाइलवर बोलणे, ट्रिपल सिट‎ वाहन चालवणे आदी कारणांमुळे‎ लायसेन्स रद्द करण्यात आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...