आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याख्यानाचे आयोजन:इतर क्षेत्राप्रमाणेच क्रीडा क्षेत्राला महत्त्व, खेळाडूंसाठीही विविध संधी ;डाॅ. पाटील

धुळे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज क्रीडा क्षेत्रालाही इतर क्षेत्राप्रमाणेच महत्त्व प्राप्त झाले आहे. या क्षेत्रातही खेळाडूंसाठी विविध प्रकारच्या संधी उपलब्ध असल्याचे मत विशेष अतिथी डाॅ.अरुण पाटील यांनी केले. गोंदूर येथील ओंकार बहुउद्येशिय विकास संस्था संचलित प्रा. रवींद्र निकम कॉलेज ऑफ फार्मसी येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस तसेच मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम झाला. त्यात माजी प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांचे व्याख्यान झाले. याप्रसंगी डॉ.अरुण पाटील यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील विविध संधी तसेच खेळांमध्ये प्रत्यक्ष सहभाग वाढवण्यासंबंधी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. भारतीय हॉकीचे जादूगार म्हणून ज्यांना आदराने संबोधले जाते असे मेजर ध्यानचंद ज्यांच्या क्रीडा कारकीर्दीत भारतीय हॉकी संघाने सलग तीन ऑलिम्पिक सुवर्ण पदक मिळवले. त्याच्याविषयी अनेक आठवणींचे स्मरण करण्यात आले. कार्यक्रमाचे विशेष अतिथी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रवींद्र ओंकार निकम, सचिव प्रा. शुभांगी निकम, बी-फार्मसीचे प्राचार्य डॉ. अविनाश पाटील, डी-फार्मसीचे प्राचार्य प्रा.सागर जाधव, पॉलिटेक्निकचे प्राचार्य अनंत वाघ, फिजिकल डायरेक्टर प्रा.विजय पाटील, प्रवीण भोसले यांच्यासह सर्व प्राध्यापक उपस्थित होते. प्रा. गणेश चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...