आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशभरातील लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केंद्र शासनाने ४ मार्च रोजी देशभरात लाईनमन दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निमित्त शहादा विभागातील प्रकाशा, तळोदा, अक्कलकुवा, सारंगखेडा, म्हसावद, मंदाणा, परिवर्धा, धडगाव आदींसह महावितरणमध्ये सर्वत्र लाईनमन दिवस साजरा करण्यात आला. उपकार्यकारी अभियंता भूषण जगताप, तिरुपती पाटील, सुजित पाटील, सचिन पावरा, अमोल मोरे, जगदीश पावरा, विनोद भदाणे, तनजिम शेख, विलास गुरव आदी अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील लाईनमन व कर्मचारी यांचा सत्कार केला.
जनमित्र म्हणजेच लाईनमन हा महावितरणच्या व्यवस्थेमधील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. महावितरणचे जनमित्र ऊन, वारा, पाऊस तसेच इतरही अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी ते चोवीस तास सेवा देतात. त्यांच्या या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. जंगलात हिंस्त्र प्राण्याच्या सान्निध्यात रात्री अपरात्री वीजपुरवठा सुरळीत केला जातो.
भर उन्हात दुपारी १२ ची वेळ किंवा संध्याकाळ, रात्र केव्हाही वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार आल्यास ती सोडवण्यासाठी लाईनमन आपली, कवच कुंडले, रबराचे हातमोजे, डिस्चार्ज रॉड, हारनेस, झुला घेवून विजेच्या खांबावर व रोहित्रांवर उन्हाच्या चटक्याची पर्वा न करता, मार्च, एप्रिलमध्ये काम करत असतो, असे साहय्यक अभियंता जगदिश पावरा यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.