आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास:पीक लागवडीसाठी विविध बँकांमार्फत कर्ज; आराळे येथे कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याचा गळफास

कोपर्ली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार तालुक्यातील आराळे येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. संतोष हारसिंग जाधव (वय ५०) असे मृत शेतकऱ्याचे नाव हे. शेतकरी संतोष जाधव (वय ५०) यांनी शेतीच्या मशागतीसाठी व पीक लागवडीसाठी विविध बँकांमार्फत कर्ज घेतले होते. मात्र शेतात अपेक्षित उत्पन्न न झाल्याने डोक्यावरील कर्ज वाढल्यामुळे ते निराश झाले होते. त्यातून त्यांनी टोकाचा निर्णय घेत राहत्या घरातील पहिल्या मजल्यावर रविवारी दुपारी घरात कुणीही नसताना गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे. मेहनती शेतकऱ्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...