आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी:धुळ्यातील सावकारास पुन्हा कोठडी, रात्री उशिरापर्यंत केली लॉकर तपासणी

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध सावकारी करणाऱ्या राजेंद्र बंब याच्याकडे अनेक मुद्यांची चौकशी करायची आहे. विमा कंपनीकडून भरण्यात येणाऱ्या सरेंडर फॉर्म बद्दलही विचारणा करायची असल्याने राजेंद्र बंबची पोलिस कोठडीत वाढवण्याची मागणी पोलिसांनी सोमवारी न्यायालयात केली. त्यानंतर दुपारी योगेश्वर पतसंस्थेतील बंब याचे लॉकर उघडण्याची कार्यवाही सुरू झाली. या ठिकाणी बंबचे सात लॉकर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या लॉकरमधील घबाड मोजण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तर राजेंंद्र बंबच्या विरोधात रविवारी दुसरा व मध्यरात्री पुन्हा दोन गुन्हे दाखल झाले.

दुकानावर होता डोळा गल्ली क्रमांक ५ मध्ये राहणारे विलास दामोदर ताकटे (वय. ४६ ) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, दीपलक्ष्मी या खताच्या दुकानासाठी बंबकडून कर्ज घेतले होते. त्याची व्याजासह परतफेड केली. मात्र, त्यानंतरही बंबने अधिक व्याज मागणी केली.

दिव्यांग बंधूंची पिळवणूक सम्राट नगरातील गणेश बाबुराव गवळी ( वय ३०) याने तक्रार दिली आहे. त्याचे मोठे बंधू अशोक व लक्ष्मण गवळी दिव्यांग आहे. म्हशी घेण्यासाठी जानेवारी २०२१ मध्ये बंबकडून १३ लाखांचे कर्ज घेतले. त्या मोबदल्यात जमिनीची कागदपत्रे घेतली होती.

बातम्या आणखी आहेत...