आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Dhule
  • Loyalty No Longer Matters In Politics, Shindegat Is China Atom; ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​| Marathi News

बैठक:राजकारणात निष्ठेला महत्त्व राहिलेले नाही, तर शिंदेगट म्हणजे चायना अॅटम; ​​​​​​​ संपर्कप्रमुख बबन थाेरात यांची टीका

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ; कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्राच्या राजकारणात निष्ठेला महत्त्व राहिले नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर शिवसेनेचा पाया महाराष्ट्रात मजबूतरीत्या उभा आहे. ईडीच्या भीतीने लाेकप्रतिनिधी भाजपच्या दावणीला जरी बांधले गेले असले तरी तळागाळातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्याबराेबर आहे. शिवसेनेतून नाे गॅरंटी नाे वाॅरंटी चायना आयटम शिंदेगट बाहेर पडला असला तरी आगामी काळात ते फुसकेच ठरतील, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बबन थाेरात यांनी केले.

जिल्हा शिवसेनेतर्फे झालेल्या सत्कारप्रसंगी ते बाेलत हाेते. शिवसेनेशी संभाजी ब्रिगेडने युती केली. त्याचे स्वागत करताना दाेन्ही गटांची बैठक बबन थाेरात यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख अतुल साेनवणे, ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, जिल्हा संघटक भगवान करनकाळ, उपजिल्हाप्रमुख किरण जाेंधळे, माजी आमदार शरद पाटील, महानगरप्रमुख धीरज पाटील, समन्वयक कैलास पाटील, महिला आघाडीच्या पुष्पा बडगुजर, अरूणा माेरे, संगीता जाेशी, संभाजी ब्रिगेडचे मनाेहर पाटील, भानुदास बगदे आदींचा सत्कार केला गेला.

याप्रसंगी शरद पाटील यांनी सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. तसेच पतीत पावन संघटनेचे माजी जिल्हाध्यक्षा सुभाष मराठे, माजी मनपा उपायुक्त बाबूराव नेरकर, मराठा क्रांती माेर्चाचे विराज गवळे, रामदास जगताप, दिनेश पाटील, दिलीप करनकाळ, सुदाम माेरे, नासीर खाटीक, प्रकाश चाैधरी, बाळ भामरे, अतुल पाटील, विजय पाटील, समाधान देसले, यशराज निकुंभ, खंडेराव जाधव, दीपक मराठे, रामकृष्ण माळी, पवन जगताप आदींनी सेनेते प्रवेश केला. कार्यक्रमाला गुलाब माळी,राजेश पटवारी, देविदास लाेणारी, ललीत माळी, भरत माेरे, नाना वाघ, धनराज पाटील, विलास चाैधरी, किशाेर वाघ, हिंमत साबळे, विश्वनाथ साेनवणे, यांच्यासह शिवसैनिक उपस्थित हाेते.

आगामी काळातील वाटचालीबद्दल चर्चा
याप्रसंगी आगामी काळातील वाटचालीबद्दल विचारविनिमय करण्यात आला. पक्षवाढीसंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच या वेळी शिवसेनेत अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

बातम्या आणखी आहेत...