आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेरबंद:मुंबई-मंगलोर लक्झरीतून 18 लाखांचे दागिने लांबवणाऱ्या मध्य प्रदेशच्या टोळीला केले जेरबंद

धुळे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकातील उडपी जिल्ह्यात मुंबई-मॅगंलोर लक्झरीतून सुमारे १८ लाखांचे दागिने लांबवणाऱ्या मध्यप्रदेशातील टोळीला एलसीबीच्या पथकाने शिताफीने अटक केली. शिवाय मुद्देमाल जप्त करुन संशयितांना कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन केले.

मुंबई-मॅगंलोर लक्झरीतून दागिने लांबवल्यानंतर टोळी कारने (एमपी-०९-डब्ल्यूएल-९२८४) पसार झाली होती. या प्रकरणी भाईंदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ही घटना १६ जूनला घडली होती. घटनेनंतर कर्नाटक पोलिस या टोळीच्या मागावर होते. औरंगाबाद मार्गे धुळ्यावरुन ही कार मध्यप्रदेशच्या दिशेने सोनगीर शिवारातून जात असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार एलसीबीने सोनगीर पोलिसांना कळवले. मुंबई-आग्रा महामार्गावरुन कार जात असतांना पोलिसांनी तीचा पाठलाग केला. टोल नाक्याजवळ कार अडवण्याचा प्रयत्न केला.

या वेळी पोलिसांच्या वाहनाला धडक देत टोळीने पसार होण्याचा प्रयत्न केला. कार अडवल्यानंतरही टोळके कारमधून बाहेर येण्यास तयार नव्हते. त्यामुळे पथकाने बळाचा वापर करुन टोळक्याला ताब्यात घेतले. चौकशी केल्यावर त्यांनी अमजद खान हूसेन खान (वय. ३३), अली खान हूसेन खान (वय. ३१), इकरार खान मुख्तार खान (वय. ३०), गोपाल पप्पु अमलवार (वय. ३५, सर्व. रा. जि. धार, मध्यप्रदेश ) असे नाव सांगितले. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी पथकाचे कौतूक केले आहे.

अशी झाली चोरी
मुंबई-मॅगंलोर लक्झरीतून दागिन्यांची वाहतूक केली जात होती. याविषयी माहिती टोळक्याला मिळाली होती. त्यानंतर टोळक्याने प्रवासात बॅग लांबवली. सीसीटिव्ही फुटेजमुळे कारचा नंबर समोर आला. हा नंबर ट्रेस करून कर्नाटक पोलिस मागावर होते.

वाहनासमोर थरार
कार चालकाने पोलिसांच्या वाहनाला धडक दिली. त्यामुळे पोलिसांनी अन्य वाहनाने कार थांबवण्याचा प्रयत्न केला. एवढे होवूनही चालक कार थांबवत नसल्यामुळे पोलिसांनी टोळक्याला जेरबंबद करण्यासाठी कारच्या काच फोडल्या. तसेच चौघांना बाहेर काढण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...