आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:जुनवाणी येथील महाेत्सवामुळे नव्या पिढीला सेंद्रिय रानभाज्यांची ओळख; अंगणवाडी सेविकांकडून कुपोषण निर्मूलनासाठी घेण्यात आली प्रतिज्ञा

अक्कलकुवा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोलगी परिसरातील जुनवाणी आंबाबारीपाडा येथे रानभाजी महोत्सव माेठ्या उत्साहात पार पडला. जुनवाणी गावातील शेतकरी गट व कृषी संजीवनी यांच्या पुढाकाराने व मोलगी परिसर सेवा समितीच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव घेण्यात आला.आदिवासी बांधवांचे जीवनमान हे जल, जंगल, जमीन, पशुधन आणि शेतीवर अवलंबून असल्याने त्यांचा आहारही जंगलातील भाज्यांवर अवलंबून असतो. मात्र बदलत्या परिस्थितीनुसार सध्याचे मानवी जीवन हे रासायनिक पद्धतीने तयार करण्यात येणाऱ्या भाज्या आणि अन्नधान्यावर अवलंबून आहे.

चा परिणाम मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या जंगलातील परंपरागत सेंद्रिय रानभाज्यांची नवीन पिढीला ओळख व्हावी यासाठी जुनवाणी गावातील सामाजिक कार्यकर्ते ओल्या पाडवी, किसन वसावे, दमण्या पाडवी व गावातील युवक, ग्रामस्थ यांनी या रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे होते होते. मोलगी परिसर सेवा समितीचे आपसिंग वसावे, अक्कलकुवा कृषी विभागाचे एम.एस. बोराटे, कृषी पर्यवेक्षक दिलीप गावित, किसन वसावे आदी उपस्थित होते.

अंगणवाडी सेविका वैशाली वसावे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण आहार व कुपोषण निर्मूलनासाठी प्रतिज्ञा घेतली. सूत्रसंचालन मोलगी परिसर सेवा समितीचे मनोहर पाडवी यांनी केले. कार्यक्रमाला कृषी सहायक प्रवीण जाधव, किरण पाडवी, सामाजिक कार्यकर्ते डॉ.कुवरसिंग वसावे, पोलिस पाटील लालसिंग पाडवी, परिसर सेवा समितीचे संकेत वळवी आदींसह कार्यकर्ते, युवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

महाेत्सवात हाेता या रानभाज्यांचा समावेश
महोत्सवात आदिवासी महिलांनी मोखो, उंबर, हेलटो, कुवलो, मोरिवड्यो, माटलो, टेंब्रे, आहले अशा अनेक प्रकारच्या भाज्या आणल्या होत्या. यावेळी मान्यवरांनी प्रदर्शनात ठेवलेल्या रानभाज्यांची पाहणी केली तसेच शिजवून आणलेल्या याच भाज्यांचा आस्वादही घेतला.

बातम्या आणखी आहेत...