आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापुराण कथा:श्रावणानिमित्त महापुराण कथा;  अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह

कीर्तन सप्ताह6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील रामी येथील प्राचीन हेमाडपंती श्रीक्षेत्र रामेश्वर महादेव मंदिरात श्रावण मासानिमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा होणार आहे.

सप्ताहाला २ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. शिव महापुराणचे कथन भागवताचार्य वामन महाराज लामकानीकर करतील. सप्ताहात समाधान महाराज रिंगणगाव, रवींद्र महाराज तारखेडेकर, मच्छिंद्र महाराज वाडीभोकर, तुकाराम महाराज खोक्राळेकर, नारायण महाराज भडणेकर, गोपाल महाराज सांजोरीकर, जीवराम महाराज कापडणेकर, कैलास महाराज चाेपडाईकर यांची कीर्तने होणार आहेत. सप्ताहाची ९ ऑगस्टला काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने सांगता होईल. सोहळ्यात रोज दुपारी तीन ते पाच शिव महापुराण कथा, सायंकाळी सहा ते सात हरिपाठ व रात्री कीर्तन होणार आहे.

कापडणेप्रभू श्रीरामाचा मुक्काम त्यामुळे पडले रामी नाव
प्रभू श्रीराम वनवासात असताना त्यांनी रामी गावातून प्रवास केला व ज्या ठिकाणी हेमाडपंती रामेश्वर मंदिर आहे . या ठिकाणी प्रभू श्रीराम मुक्कामाला थांबले. त्यामुळे त्याच ठिकाणी हेमाडपंती मंदिराची उभारणी करण्यात आल्याची आख्यायिका पूर्वज सांगतात. श्रीराम यांच्या नावावरून गावाचे रामी ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते.

बातम्या आणखी आहेत...