आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात कोरोना महामारीचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. यातच धुळे जिल्हातून एका लाजीरवाण्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका कुटुंबातील 70 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. दरम्यान, त्यांचा मृतदेह घरामध्ये जवळपास 10 तासांपर्यंत तसाच पडून होता. कुटुंबातील सदस्यांचा आरोप आहे की, स्थानिक प्रशासनाला सतत फोन केला असता त्यांच्याकडून कोणत्याच प्रकारचा पाठपुरावा करण्यात आला नाही. फक्त उडवाउडवी उत्तरे देण्यात आली. परिणामी, त्यांच्या कुटुंबाने त्याचा मृतदेह कचरा गाडी टाकत स्मशानभूमीत नेला. त्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी कोरोनाची पीपीई किटदेखील मृतव्यक्तीच्या नातेवाईकांनी स्वत: आणली.
स्थानिक प्रशासनाकडून या गोष्टीची दखल घेण्यात आली असून कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या आरोपांचे तथ्य तपासले जात आहे. दरम्यान, प्रशासनाकडून संबंधित घटनेबाबत चौकशी सुरु केली आहे.
कुटुंबातील सदस्यांना 10 तासांपर्यंत फक्त आश्वासन
ही घटना धुळे जिल्ह्यातील सामोडे गावात शुक्रवार व शनिवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास घडली आहे. परिवारांच्या माहितीनुसार, स्थानिक ग्राम पंचायत सदस्यांना याबाबतची माहिती दिली. परंतु, त्यांच्याकडून फक्त आश्वासन देण्यात आले.
मजबूरीमध्ये कुटुंबाना मृतदेह कचरा गाडीत न्यावा लागला
दहा तास उलटल्यानंतरही रुग्णवाहीका न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी कचरा गाडीत मृतदेह घेऊन गेले. त्यानंतर तेथे गेल्यावर मृतदेहावर स्वत:च अंत्यसंस्कार केले. त्यामुळे ग्राम पंचायत आता याबाबतीत चौकशी करीत आहे.
धुळे जिल्ह्यात 30 हजार नवीन रुग्ण
गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात 383 नवीन रुग्ण आढळले असून त्यात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 30 हजार 712 लोक कोरोना महामारीच्या विळ्याख्यात सापडले असून यामध्ये 26 हजार 235 लोक बरे झाले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, येथे आतापर्यंत 78 हजारांपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झाले आहे. त्यामध्ये 7800 लोकांनी कोरोना लसीचा दुसरा डोज घेतला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.