आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक घेण्याची विरोधकांची तयारी:स्थायीत महाविकासला हव्या दोन जागा

धुळे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद स्थायी समितीतील तीन सदस्यांची अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती म्हणून निवड झाली. त्यामुळे स्थायी समितीतील तीन जागा रिक्त झाल्या. तसेच स्थायी समितीत आता काही फेरबदल होणार आहे. समितीत महाविकास आघाडीच्या दोन सदस्यांना संधी द्यावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. तसे झाले नाही तर निवडणूक लढवण्याची तयारी महाविकास आघाडीने केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षासह विषय समिती सभापतींची निवड गेल्या महिन्यात झाली. त्यानंतर आता स्थायी समितीतील रिक्त जागांवर नव्याने सदस्यांची निवड होणार आहे. समितीत अध्यक्षांसह १४ सदस्य असतात. विषय समित्यांचे सभापती आणि सदस्य हे समितीचे पदसिद्ध सदस्य असतात. पूर्वीच्या स्थायी समितीचे तीन सदस्य आता पदाधिकारी झाले आहे. त्यामुळे तीन सदस्यांची पदे रिक्त झाली आहे. तिन्ही जागांवर माजी पदाधिकाऱ्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. निवडणूक झाली तर प्रशासनाचा ताण वाढेल.

समितीत १४ पैकी १३ सदस्य भारतीय जनता पक्षाचे
स्थायीच्या १४ सदस्यांमध्ये १३ सदस्य सत्ताधारी भाजपचे आहे. विरोधी पक्षाकडे एकच जागा आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीने स्थायी समितीत किमान दोन जागा द्यावा अशी मागणी केली आहे. तसे झाले नाही तर निवडणूक लढवण्याची तयारी महाविकास आघाडीने सुरू केली आहे.

बातम्या आणखी आहेत...