आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:महामार्ग दुरुस्ती कामाचा दर्जा राखा; निकृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी : मनसे

साक्री2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री शहरातून जाणाऱ्या सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी मनसेचे जिल्हा संघटक धीरज देसले व योगेश दाभाडे-पाटील यांनी केली होती. त्यानुसार खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. पण हे काम निकृष्ट पद्धतीने होते आहे. रस्ता दुरुस्तीच्या कामाचा दर्जा राखला जावा, निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

साक्री शहरातून सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग जातो. महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. वाहनचालकांना होणारा त्रास लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक धीरज देसले व योगेश दाभाडे-पाटील यांनी खड्ड्यांची डागडुजी करण्याबाबत संबंधित विभागाला निवेदन दिले होते. त्यानंतर रस्त्याची डागडुजी करण्याचे काम सुरू करण्यात आले. हे काम करत असताना खड्ड्यातील माती काढून डांबर आणि गिट्टीच्या सहाय्याने खड्डे बुजवले जात आहे. निकृष्ट पध्दतीने साहित्य वापरून रस्ते दुरुस्ती केली जाते आहे.

त्यामुळे पुन्हा रस्त्यावर खड्डे पडतील. या कामाची मनसेचे धीरज देसले व योगेश दाभाडे-पाटील यांनी पाहणी केली. या वेळी त्यांनी कामाचा दर्जा सुधारण्याच्या सूचना केल्या. या कामाकडे संबंधित विभागाच्या अभियंत्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. रस्त्याचे काम योग्य पध्दतीने करावे, तसे झाले नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे धीरज देसले व योगेश दाभाडे-पाटील यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...