आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाज संमेलन:देशात एकता टिकवणे सर्वांची नैतिक जबाबदारी; संत ओझांचे मत, अग्रवाल समाज संमेलन समारोप

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समाज संघटित झाला पाहिजे. तसेच तो शक्ती, सामर्थ्ययुक्त असावा. त्यासाठी सर्वांनी सर्वप्रथम कुटुंबाकडे लक्ष द्यावे. कारण कुटुंब सक्षम असेल तरच सामाजिक कार्याकडे लक्ष देता येईल व राष्ट्र मजबूत होईल. देशाची एकता टिकवणे केवळ हिंदूंची नव्हे तर देशातील प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत रमेश ओझा यांनी केले.

शहरातील हिरे भवनात अग्रवाल समाजाचे संमेलन अर्थात अग्र महाकुंभ सुरू होता. त्याचा रविवारी समारोप झाला. त्या वेळी ते बोलत हाेते. विजयकुमार चौधरी अध्यक्षस्थानी होते. या वेळी साध्वी ऋतुंभरा, संजीव कृष्णजी, आचार्य इंद्रेश, साध्वी चित्रलेखा, राजेश्वरी मोदी, गोपाल अग्रवाल, नरेंद्र अग्रवाल, कैलासचंद्र अग्रवाल, अॅड. मुकेश गोयंका, मालती गुप्ता, किरण अग्रवाल, संजय अग्रवाल, अजय अग्रवाल, रमाकांत खेतान, सुनील सिंघानिया आदी उपस्थित हाेते. राष्ट्रसंत रमेश ओझा म्हणाले की, जीवनात संपन्नता असली तरी काही वेळा सुख मिळत नाही. सुख हे समाजाकडून प्राप्त होते. प्रत्येकाला सुख वाटता आले पाहिजे. समाज सामर्थ्यवान झाला पाहिजे. त्यासाठी सुरुवात स्वत:पासून करावी. राष्ट्र प्रथम ही भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावी, असेही ते म्हणाले.

पुरस्कारांचे वितरण
संमेलनात अग्रविभूषण पुरस्कार आेमप्रकाश अग्रवाल व जालना येथील सुभाषचंद्र देविदान यांना तर अग्रश्री पुरस्कार उत्तमचंद गोयंका, दुर्गाप्रसाद अग्रवाल, वसंतकुमार अग्रवाल, रमेशचंद्र अग्रवाल, कैलाशचंद्र अग्रवाल, अनिलकुमार अग्रवाल, श्याम ढेडिया, अशोक अग्रवाल, विनोद मित्तल यांना दिला.

बातम्या आणखी आहेत...