आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन:मजीप्राचे हात वर; शहरात पालिका बुजवतेय खड्डे

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गणेशाेत्सवात आता गणरायाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. गणेश विसर्जनासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवणे होय. महापालिकेकडून आता मुरूम टाकून तात्पुरते खड्डे बुजवणे सुरू झाले आहे. यात देवपूर भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला खड्डे बुजवण्याच्या सूचना मनपा आयुक्तांनी केल्या होत्या. मात्र मजीप्राकडून कार्यवाही न झाल्याने महापालिकेकडूनच काम करण्यात येत आहे. गणपतीचे शहरात वाजत गाजत आगमन घरोघरी व सार्वजनिक गणेश मंडळात झाले आहे.

शहरात सर्वत्र गणेशाेत्सवाचे वातावरण आहे. तर आता गणरायाला निरोप देण्याची वेळ जवळ येत आहे. दोन दिवसांवर विसर्जन आले आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्वत्र गणपतीला निरोप देण्यात येतो. शहरातून सार्वजनिक गणेश मंडळाचे गणपतीची वाजत गाजत मिरवणूक काढून गणपतीला निरोप देण्यात येतो. पांझरा नदी किनारी सात ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यातही गणेश मंडळाच्या मोठ्या मूर्ती हत्तीडोह येथे विसर्जन होते. विसर्जन मिरवणुकीसाठी महापालिकेने शहरातील विविध भागातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यात देवपूर भागातील मुख्य रस्त्याला जोडणारे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...