आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैसर्गिक अपघात:मांडळला वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू; पावसाचा वेग वाढल्याने निंबाच्या झाडाखाली उभे राहिले

दोंडाईचा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुक्यातील मांडळ शिवारात वीज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. हिरालाल पीतांबर पाटील (वय ३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतात काम करत असताना अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हिरालाल पाटील बैलगाडी घेऊन घराकडे येत होते. त्या वेळी त्यांच्या अंगावर वीज पडली.

तालुक्यात गुरुवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास मांडळ, खर्दे, सुराये, मालपूर आदी भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. या वेळी मांडळ शिवारातील शेतात हिरालाल पाटील काम करत होते. पाऊस सुरू झाल्यावर ते बैलगाडी घेऊन घराकडे येत होते. पावसाचा वेग वाढल्याने ते निंबाच्या झाडाखाली उभे होते. त्या वेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यानंतर त्यांना दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल भामरे यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...