आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटप:मराठी शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा; गोंदूरला मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप

कापडणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील गोंदूर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांना सरपंच सविता भदाणे यांच्या हस्ते मोफत पुस्तकांचे वाटप झाले. मेळाव्याचे उद्घाटन ग्रामपंचायत शिक्षण समितीचे अध्यक्ष शरद भदाणे व ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण नेरकर यांच्या हस्ते झाले. सरपंच सविता किशोर भदाणे अध्यक्षस्थानी होत्या. शाळेची सजावट करण्यात आली होती.

विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे विविध स्टॉलही लावण्यात आले होते. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. पहिली ते चौथी वर्गातील विद्यार्थ्यांना पुस्तके व गणवेश देण्यात आला. या वेळी सरपंच सविता भदाणे, किशोर भदाणे, कैलास पाटील, मोतीलाल पवार, प्रभारी मुख्याध्यापक किशोर भामरे, संजय वारुळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...