आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जानेवारीपर्यंत मंगल कार्यालय; लॉन्स फुल्ल

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुळशी विवाह सुरू झाल्याने आता लग्नसराईला प्रारंभ होईल. काेराेनाचे निर्बंध नसल्याने यंदा विवाह सोहळे धुमधडाक्यात होतील. त्यामुळे दाेन वर्षांनंतर मंगल कार्यालय, केटरिंग चालक आणि विवाहाशी संबंधित विविध व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यंदा सहा महिन्यांत जवळपास ५० विवाह तिथी आहे. पहिली तिथी २६ नाेव्हेंबरला असून, शहरात २८ नाेव्हेंबर, १४ व १८ डिसेंबरला सर्वाधिक विवाह लागतील. तसेच जानेवारीपर्यंत मंगल कार्यालय, लॉन्स चालकांकडे नोंदणी झाली आहे. दुसरीकडे महामाईमुळे भोजनाच्या थाळीत सरासरी २० रुपये वाढ झाली आहे.

लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर आता तयारीला वेग आला आहे. विवाहाला आता इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच आता कोरोनाचे निर्बंध नसल्याने यंदा विवाह सोहळे जोरात होतील. त्यामुळे मंगल कार्यालयापासून हाॅटेल व्यावसायिकांनी विवाहासाठी विविध प्रकारचे पॅकेज तयार केले आहे. नाेव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीत असलेल्या विवाह तिथीपैकी ६० टक्केपेक्षाच्या तारखांसाठी नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती मंगल कार्यालय, लाॅन्स व्यावसायिकांनी दिली. लग्ससराईमुळे बाजारात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुरोहितापासून अश्वाचा पॅकेजमध्ये समावेश...
विवाहासाठी विविध प्रकारचे पॅकेज उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे पॅकेज दीड लाखापासून दहा ते पंधरा लाखापर्यंत आहे. पॅकेजमध्ये पुरोहितापासून अश्वापर्यंत सर्व सुविधांचा समावेश आहे. मंगल कार्यालय व लाॅन्स मिळत नसल्याने काहींनी आता दारात विवाह लावण्याचे नियोजन सुरू केले आहे. त्यासाठी मंडप चालकांकडे नांेदणी करण्यास प्राधान्य दिले जाते आहे.

महागाईचा बसणार फटका
सिलिंडर, तेलाच्या व इतरही वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने भोजन थाळीमागे २० रुपयांनी वाढ झाली आहे. दीडशे रुपयांपासून पुढे पदार्थानुसार थाळीचे दर असल्याची माहिती दाते केटरर्सचे हेरंब दाते यांनी दिली.

दागिने घडवण्यावर भर
लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी सोने, चांदी खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहे. साेने खरेदी करून आवडीप्रमाणे दागिने घडवण्यावर अधिक भर असल्याचे शहरातील सराफ व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. सराफ बाजारात मंगळसूत्र, अंगठीचे अनेक प्रकार दाखल झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...