आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीचा कडाका वाढला:कमाल तापमान 28  अंशांवर; किमान दुसऱ्या दिवशीही 7  अंशांवर स्थिर

धुळे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. त्यानुसार रविवारी रात्री कमाल २८ व किमान ७.४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. थंडीमुळे रात्री साडेआठनंतर बाजारात शुकशुकाट होतो. काही दिवसांपासून रात्रीचे तापमान वेगात कमी झाले आहे. सायंकाळी पाच वाजेनंतर गारठा जाणवण्यास सुरुवात होते. थंडी वाढल्याने सकाळी व्यायामासाठी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

शहराचे कमाल तापमान रविवारी रात्री २८ अंश होते. यापूर्वी ते २९ अंश होते. त्यात एका अंशाने घट झाली आहे. काही दिवस थंडीचा प्रकोप कायम असेल, अशी माहिती देण्यात आली. दरम्यान, थंडी वाढल्याने शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीवर सकाळी धुक्याची चादर असते. तसेच थंडीमुळे आरेाग्याच्या तक्रारी वाढल्या आहे. त्यामुळे काळजी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...