आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावरणात बदल:शहरातील कमाल तापमान 33 अंश; उकाड्याची स्थिती

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील वातावरण गेल्या काही दिवसांपासून बदलले आहे. थंडीचे दिवस सुरू असताना कमाल व किमान तापमान वाढून नागरिक उकाड्याची स्थिती अनुभवत आहे. शनिवारी कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसची नोंद केली आहे. शहरातील वातावरणात बदल होऊन आठवडाभरापेक्षा अधिकचा कालावधी झालेला आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने दमटपणा निर्माण झाला आहे.

यामुळे थंडीचा प्रभाव पूर्णपणे कमी झालेला आहे. ढगाळ वातावरण व कमाल व तापमानातील वाढीमुळे आता बाहेर फिरताना उन्हाची तीव्रता जाणवत असून घामही येत आहे. कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढ झालेली आहे. शुक्रवारी ३१ अंश सेल्सिअसची नोंद केली होती. तर शनिवारी त्यात वाढ होऊन ३३ अंश सेल्सिअसची कृषी महाविद्यालयात नोंद झाली. समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढल्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा वातावरणातील बदल जाणवत आहे.

बातम्या आणखी आहेत...