आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन‎:धुळे शहरातील बूथ क्रमांक 55  च्या‎ प्रमुखांना महापौरांनी केले मार्गदर्शन‎

धुळे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षामध्ये बूथ‎ संकल्पनेला फार महत्त्व आहे.‎ देशाच्या राष्ट्रीय अध्यक्षपासून तर‎ प्रदेशाध्यक्षांपर्यंत प्रत्येक जण‎ त्यांच्या बूथवर स्वतः जाऊन बैठक‎ घेतात. त्याप्रमाणे महापौर प्रतिभा‎ चौधरी यादेखील बूथ क्रमांक ५५‎ च्या प्रमुख असून त्यांनीही त्यांच्या‎ बूथप्रमुखांची बैठक घेतली आहे.‎ भाजप प्रदेश सरचिटणीस विजय‎ चौधरी यांचा दौरा नुकताच झाला.‎

त्यात त्यांच्या आदेशानुसार सर्व बूथ‎ प्रमुखांनी आपापल्या बूथच्या बैठका‎ घ्याव्यात, असे सांगितले होते.‎ त्यानुसार महापौर यादेखील बूथ‎‎‎‎‎‎‎‎‎‎ क्रमांक ५५ च्या बूथ प्रमुख आहेत.‎ त्यांनी महापालिकेच्या दालनात‎ बुधवारी त्यांच्या सर्व बूथ प्रमुखांची‎ बैठक बोलावली होती. बैठकीत‎ भाजपचे धुळे जिल्हा संघटन‎ सरचिटणीस यशवंत येवलेकर यांनी‎ मार्गदर्शन केले. महापौर प्रतिभा‎ चौधरी यांनी विविध योजनांची‎‎‎‎‎‎‎‎‎‎ माहिती उपस्थित बूथ प्रमुखांना‎ दिली. तसेच सर्व बूथ प्रमुखांनी‎ पन्ना प्रमुखांची नियुक्ती करत‎ मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क करावा,‎ असे आवाहनही केले. बैठकीत‎ अशोक चौधरी, विलास पाटील‎ चंद्रशेखर भट, संजीव सिसोदे‎ ज्योत्स्ना सिसोदे उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...