आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेची शहरात मोहीम:गोवरचा बूस्टर डोस आजपासून देणार

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात आत्तापर्यंत गोवरचे १५४ संशयित रुग्ण आढळले आहे. गोवरची लस दोन वर्षांपर्यंतच्या बालकांना द्यावी लागते. ज्या बालकांना गोवरचे दोन डोस दिले गेले आहे त्यांना सोमवारपासून बूस्टर डोस दिला जाणार आहे. तसेच पाच वर्षाच्या आतील ज्या बालकांनी लस घेतली नसेल त्यांनाही ही लस देता येणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

गोवर प्रतिबंधक लसीचा पहिला डोस ९ महिने ते १ वर्षापर्यंतच्या बालकांना, दुसरा डोस १६ ते २४ महिन्याच्या बालकांना दिला जातो. दोन्ही डोसमध्ये १ महिन्याचे अंतर असते. पण ज्या बालकांना या वयोगटात लस दिली गेली नसेल त्यांना ५ वर्षापर्यंत लस देता येऊ शकते. ज्या बालकांचे दोन डोस पूर्ण झाले आहे. त्यांना सोमवारपासून तिसरा म्हणजे बूस्टर डोस देण्यात येणार आहे. बूस्टर डोस घरोघरी सर्वेक्षण करणाऱ्या पथकातर्फे तसेच महापालिकेच्या आरोग्य केंद्रात देण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...