आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:टंचाईवर जलशुद्धीकरण केंद्र क्षमता वाढीचा उपाय; 15 कंत्राटी अभियंते, 27 फिटर घेणार; पाच दिवसांआड पाणीपुरवठ्याचे नियोजन, दुरुस्तीचे काम पुढील महिन्यात

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता अपूर्ण असल्याच्या तांत्रिक कारणामुळे पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होतो. त्यामुळे आता बाभळे, हनुमान टेकडी, डेडरगाव जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न होतील. त्यासाठी तातडीने निविदा काढण्यात येणार आहे. तसेच कंत्राटी तत्त्वावर १५ अभियंते व २७ फिटर, व्हॉल्व्हमन घेण्यात येतील. पाणीप्रश्नाचा आढावा घेण्यासाठी महापालिका स्थायी समिती सभापती शीतल नवले यांनी गुरुवारी विभागप्रमुखांची बैठक घेतली. बैठकीत जलस्रोतांमध्ये उपलब्ध पाणीसाठा, जलवाहिन्यांच्या गळत्या थांबवण्याचा आढावा घेतला. तसेच आठवडाभरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची सूचना केली. शहराला १०० एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना पुरवठा ५० एमएलडीच होतो आहे. त्यामुळे वेळेत पुरेसे पाणी देत नाही.

त्यामुळे पाण्याची आवक वाढल्यावर पाणीपुरवठ्याचे दिवस कमी होतील. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्राचीही क्षमता कमी झाल्याने ती वाढवणे आवश्यक आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवावी, अशी सूचना सभापती नवले यांनी बैठकीत केले. हे काम पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...