आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:ध्यान साधना, दैवी शक्तीवर कार्यशाळा‎

धुळे‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उच्च व तंत्र शिक्षण विभाग,‎ महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, श्री शिवाजी विद्या प्रसारक ‎ ‎ संस्थेच्या साहित्य आणि वाणिज्य ‎ ‎ महाविद्यालयातील करिअर कट्टा व ‎जयश्री फाउंडेशनतर्फे ध्यान साधना‎ व दैवी शक्ती या विषयावर एक‎ दिवसीय कार्यशाळा झाली.‎ कार्यशाळेचे उद्घाटन मुंबई‎ येथील मैत्री परिवाराच्या अध्यक्षा डॉ‎‎.वंदना सावंत आणि‎ महाविद्यालयाचे डॉ. प्राचार्य मनोहर‎ पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी‎ मुंबईच्या विद्या कुलकर्णी, शीतल‎ कुडुस्कर, जयश्री फाउंडेशनचे‎ अध्यक्ष जयवंतराव पाटील, मुकुल‎ पाटील, डॉ. संभाजी पाटील, प्रा.‎ आनंद पवार, डॉ. सचिन जाधव‎ आदी उपस्थित होते.

डॉ. वंदना‎ सावंत म्हणाल्या की, मनुष्याचे‎ जीवन खूप सुंदर आहे आणि अशा‎ जीवनासाठी ध्यान साधना करणे‎ गरजेचे आहे. ध्यान साधनेच्या‎ माध्यमातून दैवी शक्ती निर्माण होते‎ आणि दैवी शक्तीतून सकारात्मक‎ कार्य करण्यास प्रेरणा मिळते. तसेच‎ मन व स्वभाव आनंदी राहतो,‎ असेही त्या म्हणाल्या. प्राचार्य डॉ.‎ मनोहर पाटील यांनी मनोगत व्यक्त‎ केले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी‎ डॉ. भाऊसाहेब देसले, नामदेव‎ पारखे यांनी प्रयत्न केले.‎

बातम्या आणखी आहेत...