आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नवापूर येथे दिव्यांग बांधवांचा मेळावा; तहसीलदार मंदार कुलकर्णींनी योजनांची दिली माहिती

नवापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा नंदुरबारच्या नवापूर तालुका शाखेचे वतीने दिव्यांग बांधवांसाठी विविध प्रकारच्या योजनांची व सवलतींचे मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन बुधवारी शहरातील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात केले होते. राज्य उपाध्यक्ष शिवाजीराव मोरे अध्यक्षस्थानी होते.

तहसीलदार मंदार कुलकर्णी, यांनी की नवापूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा व अंत्योदय योजना लाभ घेण्यासाठी पदाधिकारींच्या माध्यमातून प्रस्ताव योग्य ती कागदपत्रांसह सादर करावेत, ते सर्व अर्ज महिन्याअखेर मंजूर करण्यात येतील, असे सांगितले. नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी यांनी सांगितले की, आमच्याकडील योजनांसाठी कार्यालयीन वेळेत तुमच्यासाठी आमची दारे सतत उघडी आहेत.

राज्य उपाध्यक्ष शिवाजीराव मोरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की नवापूर तालुक्यातील कार्यकारिणी त्वरित गठीत करून आपली ताकद निर्माण करावी. काही आपल्याच आजुबाजूला असलेले लोकं अपंगत्वावरून हिणवतात व त्रास देतात, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे सांगितले. निवृत्त डीडीसीसी बँक मॅनेजर जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप बागुल यांनी बचतगट स्थापन करून उद्योग रोजगार सुरू करावेत असे आवाहन केले.

जिल्हा उपाध्यक्ष जयपाल परदेशी व प्रमोद बैसाणे, जिल्हा महिला अध्यक्षा सुनीता कुवर, जिल्हा समन्वयक राजा कुवर, जिल्हा संचालक फारुख शेख, मासूम मनियार, शहादा ता. उपाध्यक्ष खलिल शेख, शहराध्यक्ष दिलावर खान, तळोदा तालुका अध्यक्ष संतोष मराठे, अक्कलकुवा तालुका अध्यक्ष दिनकर पाडवी उपस्थित होते. जिल्हा डायरेक्टर गुलाबसिंग गावित, नवापूर तालुका अध्यक्ष शिवदास गावित, उपसरपंच वडसत्रा काशिराम गावित, अजित गावित, डॉ. विनायक गावित यांची तालुका सल्लागारपदी, तर तनुजा वसावे यांची तालुका अध्यक्ष तर विरंती गावित यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...