आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:‘शिसाका’साठी आज बैठक

धुळे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर सुरू करण्यासाठी उद्या बुधवारी (दि.१५) सकाळी साडेअकरा वाजता सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक हाेईल. बैठकीला सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव व जिल्ह्यातील पदाधिकारी, अधिकारी उपस्थित असतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे डाॅ. जितेंद्र ठाकूर यांनी दिली.

शिरपूर साखर कारखाना दहा ते बारा वर्षांपासून बंद आहे. कारखाना सुरू व्हावा यासाठी डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर शरद पवार यांनी सहकार मंत्र्यांशी चर्चा करून कारखाना सुरू करण्याची कार्यवाही करावी अशी सूचना केली. त्यानुसार उद्या बुधवारी बैठक होणार आहे. बैठकीला सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव, साखर आयुक्त, जिल्हा बँकेचे अधिकारी, साखर कारखाना शेतकरी संघर्ष समिती सदस्यांसह डॉ. ठाकूर उपस्थित असतील.

बातम्या आणखी आहेत...